Ad will apear here
Next
कर्करोगाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी...


चार फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन होऊन गेला. त्या निमित्ताने...

.......
कर्करोग म्हणजेच कॅन्सर हे नाव घेतल्याबरोबरच अनेकांच्या मनात धडकी भरते. आजदेखील ग्रामीण भागात तर सोडाच, परंतु शहरी आणि निमशहरी भागांमध्येही या आजाराबद्दल उघडपणे बोलले जात नाही. कर्करोग किंवा कॅन्सर याची भीती इतकी का आहे? सर्वसामान्यांमध्ये असा समज आहे, की या आजारावर कोणताही उपचार नाही, हा आजार कधीही बरा होऊ शकत नाही. काही अंशी हे खरे असले तरी परिस्थिती वेगळी आहे. आपण पहिल्यांदा हे पाहू या, की कर्करोग म्हणजे नेमके काय?

डासांमुळे होणारे डेंग्यू, चिकुनगुनिया हे आजार, तसेच कोणतेही जीवजंतू आणि बॅक्टेरिया यांमुळे होणारे आजार वगळता नॉनकमुनिकॅल डिसऑर्डरमुळे डायबेटीस, उच्च रक्तदाब, संधिवात, दमा, जठरव्रण आणि पोटातील अल्सर हे सगळे होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे; पण या सगळ्यांमध्येही कर्करोग म्हणजे कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त आहे. मानवी शरीरातील पेशीनिर्मितीच्या सर्वसामान्य प्रक्रियेमध्ये असमतोल होऊन जेव्हा पेशीची स्थिती, उत्पत्ती, लय आणि निर्मिती ही व्यवस्था बिघडते, तेव्हा कॅन्सरसारखे आजार होण्याची शक्यता वाढते. 

कॅन्सर हा खरे तर आजार नाही असे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे. आपल्या शरीरामध्ये जन्मापासून अगदी मृत्यूपर्यंत दररोज पेशी निर्माण होणे आणि पेशींचा ऱ्हास होणे ही प्रक्रिया निरंतर चालू असते. या प्रक्रियेला सेल जनरेशन आणि डी-जनरेशन असे म्हणतात. या प्रक्रियेचा एक विशिष्ट वेग आहे. उदाहरणार्थ, आपल्या रक्तातील लाल पेशी या १२० दिवस टिकतात. १२० दिवसांमध्ये रक्तातील या पेशी बदलणे चालू असते. या पेशी एका दिवसात बदलत नाहीत, तर दररोज या पेशींचा एकशे विसावा भाग बदलत असतो. हा भाग बदलताना वेग कमी-जास्त झाला तर तो कुठल्या ना कुठल्या आजाराशी निगडित होतो. 

पेशींचे विभाजन एका विशिष्ट कालावधीमध्ये होणे अपेक्षित असते. म्हणजे सर्वसाधारणपणे मूळ पेशी असलेल्या स्टेमसेल या संपूर्ण आयुष्यात शंभर वेळा बदलल्या जातात असे मानले जाते. याचा अर्थ असा, की एका पेशीच्या दोन, दोनाच्या चार, चाराच्या आठ, आठच्या सोळा ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे आयुष्यभर आपल्या शरीरामध्ये सुरू असते. पेशींच्या विभागाचा वेग जर वर्षातून एक वेळा असेल, तर ती व्यक्ती जवळ जवळ शंभर वर्षे जगते. आणि जर ती सहा महिन्यातून एकदा विभागली जात असेल, तर ती व्यक्ती पन्नास वर्षे जगते हेसुद्धा शास्त्र सांगते.



जागतिक आरोग्य संघटना, अमेरिकन डायबेटिक असोसिएशन, अमेरिकन मेडिकल असोसिएशन या सर्वांच्या संशोधनामध्ये असे सिद्ध झाले आहे, की पेशी विभाजनाचा वेग हेच कॅन्सरमागील मुख्य कारण आहे. हा वेग जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त वाढतो त्या वेळी शरीरातील नको असणाऱ्या म्हणजेच डेड सेल्स वाढतात. त्याचा एका ठिकाणी पुंजका होऊन कॅन्सरची गाठ तयार होते. कॅन्सर हा आजार नाही असे काही डॉक्टर आणि शास्त्रज्ञांचे मत आहे. याचे कारण आपण पाहू. कॅन्सरची उत्पत्ती कशी होते आणि कॅन्सरचे मूळ कशामध्ये आहे हे पाहू.

आजकाल जीवनशैलीमध्ये जबरदस्त बदल झाला आहे. खाण्यापिण्याच्या, विश्रांतीच्या सवयी बदलल्या आहेत. आहार-विहार आणि विचारांच्या अनियंत्रित सवयींमध्ये फास्ट फूड, जंक फूड आणि त्याचबरोबरीने हवा आणि पाणी यामधील प्रदूषण हे प्रमुख घटक आहेत. हवेचे प्रदूषण तर दररोजच वाढत आहे. मोठ्या शहरांमध्ये तर श्वास घ्यायलाही जमत नाही अशी परिस्थिती अनेकदा निर्माण होते. जे अन्नधान्य आपल्या घरांमध्ये येते, त्यावर नको ती केमिकल पेस्टिसाइड्स प्रमाणापेक्षा जास्त फवारली जातात. भाज्या ताज्या दिसण्यासाठी अनेक रसायने वापरली जातात. भाज्यांचे वजन वाढविण्यासाठी अनेक रसायने वापरली जातात. यामुळे शरीरातील विषद्रव्यांचे प्रमाण वाढत जाते. त्याला आजच्या आधुनिक भाषेमध्ये प्रीरॅडिकल असे म्हटले जाते. वेगळा झालेला ऑक्सिजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर अँटिऑक्सीडंट म्हणून केमिकल्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. त्याचे मूळ कारण हे आपला आहार-विहार आणि विचारांचे असंतुलन आणि असमतोलामध्येच आहे हे सिद्ध झाले आहे. म्हणजे आपला आहार संतुलित हवा. आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त शाकाहाराचा समावेश केला पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वेळेवर खाणे आणि वेळेवर विश्रांती घेतली पाहिजे.



कॅन्सर होऊ नये म्हणून आणखी काय करता येईल याचे सर्वांत मोठे उत्तर आहे निसर्गातील क्लोरोफिल. नैसर्गिक घटकांमध्ये हरितद्रव्य किंवा क्लोरोफिलचे प्रमाण चांगले असते. योग्य प्रमाणात क्लोरोफिल दररोजच्या आहारामध्ये असेल तर कॅन्सरला प्रतिबंध करता येतो. परंतु दुर्दैवाने पालेभाज्या, फळभाज्या आणि त्यातील कस गेल्या पंचवीस-तीस वर्षांत खूप कमी झाल्यामुळे हे हरितद्रव्य दररोज योग्य प्रमाणात मिळत नाही. अशा वेळेला क्लोरोफिल दररोज आपण १५ मिलिलिटर घेतले तरी आपण कॅन्सरपासून सुटका करून घेऊ शकतो. कर्करोगाच्या कचाट्यातून सुटका करण्यासाठी ही एक संजीवनी आहे. 

याचबरोबरीने निसर्गातील अनेक इतर घटक म्हणजे गाय व्यायल्यानंतर येणारा पहिला चिक म्हणजेच काऊ कोलेस्टेरॉलसुद्धा कॅन्सर प्रतिबंध करते. कॅन्सरवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्या रोजच्या जेवणातील हळद. या हळदीचा अर्क म्हणजेच कुरकुम, १०० ग्रॅम हळदीमध्ये अंदाजे तीन ग्रॅम असतो. कॅन्सर होऊ नये म्हणून किंवा कॅन्सर झाल्यानंतरही तो कॅन्सर वाढू नये यासाठी तो अत्यंत उपायकारक असतो हे सिद्ध झाले आहे. 



याच बरोबरीने काही आयुर्वेदीय वनस्पती आणि नैसर्गिक आहाराची पद्धत यामुळे आपल्याला कॅन्सर निश्चित रोखता येतो. कॅन्सर हा घाबरण्यासारखा आजार एवढ्यासाठीच आहे, की अनेकदा या आजाराचे वेळेवर निदान होत नाही. निदान झाल्याहोईपर्यंत दुसरा-तिसरा टप्पा ओलांडलेला असतो. त्या कॅन्सरने तिसऱ्या आणि चौथ्या पायरीवर शरीराच्या अनेक अवयवांमध्ये प्रवेश केलेला असतो. त्यामुळे अनेक अवयव निकामी होण्याचाही धोका असतो. 

कॅन्सरमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत - जसे की ब्रेस्ट कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, पोटांमधील आतड्यांचा कॅन्सर – ते वेगवेगळ्या अवयवांमध्ये होत असले तरी त्याचे मूळ कारण हे आपल्या सदोष जीवनशैलीमध्ये आहे, याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. त्यामुळे संतुलित आहार, संतुलित विहार आणि संतुलित विचार हीच कर्करोगाच्या कचाट्यातून सुटण्याची खरी गुरुकिल्ली आहे. त्याचबरोबर हरितद्रव्याचा भरपूर, योग्य वापर करायला हवा. हाच याचा एक राजमार्ग आहे.

डॉ. पी. एन. कदम- डॉ. पी. एन. कदम (MBBS, MS (Psy.))
(डायरेक्टर, संकल्प ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YUTBCV
Similar Posts
Woman Cures Cancer without Medicines I had the opportunity of interviewing Gigi Jones, who healed herself from colon cancer, without any medicines. Her cancer was not genetic, instead, it was caused due to very wrong eating habits, typically involving lots of meat. However, after implementing this diet & lifestyle, it took her only 3 months to reverse it
इस डाएट प्लान से किसी भी बीमारी का इलाज संभव | क्या आप diabetes, back pain, knee pain, thyroid, constipation, acne, high blood pressure, PCOD, low energy, obesity, hairfall से छुटकारा पाना चाहते हैं? तो इस वीडियो में बताए गए प्राकृतिक भोजन के ४ नियमों का पालन करें।
प्राणचक्र विचार (सूर्यनमस्कार लेखमाला - ९) मागच्या आठवड्यात आपण सूर्यनमस्कार घालत असताना घ्यायची सूर्याची नावे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या कृतज्ञता (Gratitude) आणि कौतुक (Apreciation) या बाबींचा विचार केला. त्यातून आपल्या शरीरावर आणि मनावर कसे चांगले परिणाम होतात तेदेखील पाहिले. आज आपण आपल्या शरीरात असलेली प्राणचक्रे, त्यांच्या जागा, त्यांचे
मेडिटेटिव्ह फॉर्म (सूर्यनमस्कार लेखमाला - १०) सकाळी उठून सूर्याला नमस्कार करणे हा असाच एक बदल आहे आणि आपल्याला तो आपल्या आयुष्याचा भाग करायचा आहे. सूर्य रोज उगवतो, मग त्याला नमस्कारदेखील रोज करायचा आहे, अशा मानसिकतेत कायमचे मुक्कामाला जाणे हा खूप मोठा बदल आहे. एका दिवशी १००० सूर्यनमस्कार घालायचे आणि नंतर ६ महिने सूर्याकडे फिरकायचेदेखील नाही. असे आपल्याला अपेक्षित नाही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language